धीरज देशमुख यांनी जिंकलं लातूरकरांच मन लातूर #DhirajDeshmukh


धीरज देशमुख यांनी जिंकलं लातूरकरांच मन लातूर


(निखिल माने): लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धिरज देशमुख यांनी रविवारी झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य दाखवत सर्व श्रोत्यांच मन जिंकलं. त्यांच्या बोलण्या मधील सहजता, नेमकेपणा आणि अधून मधून केलेले विनोद यातून त्यांनी लातूरकरांना साद घातली. या भाषणांमधून त्यांनी ३ या आकड्याचे महत्व सांगितले, तीन पक्षांच सरकार, तीन तारखेला झालेल्या घडामोडी आणि तिन्ही भावंडांमधला असलेला तिसरा नंबर याविषयी सांगताना त्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदार केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याची शैली त्यांची स्वतःची असल्याचे जाणवले, भाषण करताना ते कोणाचीही नक्कल करत असल्याचे जाणवत नाही. १९९९ नंतर प्रत्येक दहा वर्षानंतर मिळत असणाऱ्या मताधिक्याबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले. भाषण करताना भावनिक होऊन त्यांनी असे सांगितले की मी विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे किंवा अमित देशमुख यांचा लहान भाऊ आहे यापेक्षा लातूर ग्रामीणचा आमदार आहे अशी स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. एकंदरच त्यांच्या वक्तृत्वा बद्दल लातूर मध्ये सर्वत्र प्रशंसा होत आहे.