मोठ्या थकबाकीदारांना सील ठोकून नीट करणार - जी श्रीकांत



 





मोठ्या थकबाकीदारांना सील ठोकून नीट करणार - जी श्रीकांत

लातूर(प्रतिनिधी)ः- लातूर शहर मनपाच्या मालमत्ता कराची मोठी थकबाकी असणाऱ्यांना सील ठोकून, वेळ पडली तर मालमत्तेचा लिलाव करून थकबाकी वसूल करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी पत्रकार परिषदेत सांगीतले. मनपाचा अतिरीक्त कारभार सांभाळताना माझे मोठ्या थकबाकीदारांकडे विशेष लक्ष असणार असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. मनपा मालमत्ता कराची सन 2016-17 पर्यंत 52.47% वसुली 2017- 18 मध्ये 25.46वसूली 2018- 19 मध्ये 31 टक्के वसुली झाली आहे. आज पर्यंत एकूण 100 कोटी वसुली झालीच नाहीसन 2017- 18 पासून मालमत्ता करा वरील सर्व व्याज माफ करण्यात आलेली आहे. मालमत्ता करामध्ये एक टक्का वृक्ष कर, एक टक्का अग्निशामक कर, दोन टक्के मनपा शिक्षण कर, दोन टक्के स्वच्छता कर, दोन टक्के पथकर इत्यादी लावण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या व्याजमाफीच्या निर्णयानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेऊन लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले. एकूण 109 कोटी कराची मागणी आहे. 21 कोटी वसूल झाले आहेत आणि 88 कोटी थकीत आहेत. मनपाच्या मालकीच्या गाळा भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येऊन दरवर्षी पाच टक्के प्रमाणे भाडेवाढ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मनपा मध्ये नगर रचनाकारच नाही. एकूण दहा पदे मंजूर असून सुद्धा एकही पद भरलेले नसल्यामुळे अवैध बांधकामांवर कारवाई करण्यामध्ये अडसर निर्माण होत असल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली.

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना २०२०  योजने अंतर्गत 72 हजार 45 शेतकरी लाभार्थी आहेत. आधार कार्ड वर आधारित ही प्रक्रिया शेतकऱ्यांना किमान चक्रा माराव्या लागाव्यात अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे. एकूण कर्जदार शेतकऱ्यांना पैकी 71236 शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक झाला आहे. लिंक करण्याच 98.80 टक्के काम झालं आहे. कर्ज मुक्ती योजना असा शब्द वापरावा असे शासनाचा आग्रह आहे. व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळून दोन लाखापर्यंत कर्ज मुक्ती मिळणार आहे. रक्कम माफ होणारे सर्व लाभार्थी दोन लाखापेक्षा खालीच आहेत. पायलट प्रोजेक्टमध्ये बाळगाव आणि आष्टा या लातूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. बाबळगाव मधील 172 शेतकरी आणि आष्टा येथील 139 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बाळगाव मध्ये 49 लाख आठ हजार 156 आणि आष्टा येथे 39 लाख 9000 रुपये रकमेचा लाभ कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एक लाख 13 हजार 785 रुपये जमा सुद्धा झालेले आहेत अशी माहिती समृद्धी जाधव यांनी दिली. अल्पमुदतीच्या दोन लाखापर्यंतच्या पिक कर्ज मधून शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती या योजनेतून होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कर्जदार शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास संबंधित तहसीलदारांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तीन दिवसांमध्ये लगेचच त्यावर मार्ग काढण्यात येईल.

 

पाणी टंचाई बद्दल बोलताना जिल्हाधिकाऱ्यानी लातूर जिल्ह्यांमधून अद्याप पर्यंत कोणत्याही गावातून मोठ्या प्रमाणात टँकरची किंवा अधिग्रहणाची मागणी आलेली नाही. किरकोळ अधिग्रहणाच्या मागण्या लगेचच पुर्ण करण्यात येत आहेत.  रोजगार हमीच्या कामांमधून सहाशे विहिरी बनवण्यात येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाणी पुरेल असे पाण्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सागितले.

55 वाळू घाटां पैकी 30 घाटांमध्ये अजूनही पाणी आहे आणि इतर घाट बॅरेजेस जवळ असल्यामुळे त्यातून वाळू उपसा करता येत नाही. सध्या होत असलेली वाळूचोरी ही भुरट्या प्रकारची आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाळू चोरी लातूरमध्ये सध्या होत नाही.