लातूरचा पाणी प्रश्न मार्गी लावू :अमित देशमुख

राजधर्म राजधर्म लातूर (प्रतिनिधी): संपूर्ण लातूर (प्रतिनिधीलातूर प्रतिनिधीप्रतिनिधीप्रतिनिधी


लातूर (प्रतिनिधी): संपूर्ण सत्कार सोहळ्या दरम्यान प्रत्येकाच्या भाषणात लातूरचा पाणीप्रश्न हा विषय घेण्यात आला. यावेळी बोलत असताना पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी स्वप्नातही नसताना मंत्री झालो. आमचे देशमुख कुटुंबीय गेली ७५ वर्षांपासून लोकांच्या सेवेमध्ये आहे. लातूरकरांची सेवा करण्याची शक्ती दे, आमच्या हातून चुकूनही चूक होणार नाही, अशी सद्बद्धी दे अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. माझा नागरी सत्कार करावा, असे मी काहीही केलेले नाही. माझा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. यात ना. बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे. लातूरकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. योजनेची व्यवहारिकता तपासली जात आहे. लातूरकरांना १०० वर्षे पाणी कमी पडणार नाही, अशी योजना देण्याचा माझा प्रयत्न आहे; मात्र यासाठी आमचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांच्या मदतीची अधिक आवश्यकता असल्याचे नमुद करून ना. देशमुख यांनी लातूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी कठोर भूमिका घेणार असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या जिल्ह्याचे सुपूत्र ना. संजय बनसोडे यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचा भार आहे. लातूरकरांच्या पाण्यासाठी संजय बनसोडे यांनी उजनीलाच मुयकाम करावा, अशी सुचना केली. आपल्या भाषणात ना. अमित देशमुख यांनी येणाऱ्या २०२४ साली राज्याचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेब थोरात यांनी भुषवावे, अशी इच्छा व्यक्त केली. प्रमुख पाणे म्हणून बोलत असताना ना. बाळासाहेब थोरात यांनी लातुरातच नव्हे तर महाराष्ट्रात नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. ना. अमित देशमुख, आ. धिरज देशमुख या देशमुख कुटुंबियांनी तरूण लोकप्रतिनिधींमध्ये राज्याचेच नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची धमक आहे, असे नमुद करून लातूरकरांना सोन्याचे नव्हे तर डायमंडचे दिवस येतील असा विश्वास व्यक्त करून अमित देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर सत्तांतर झाले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा उठाव केल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. वेगवेगळ्या पक्षाचे हे सरकार असले तरी समान कार्यक्रमावर हे सरकार पाच वर्षे चालवून दाखवू असा विश्वास ना. थोरात यांनी व्यक्त केला. अत्यंत छोटेखानी अशा अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नवीन नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. नागरी सत्कार सोहळ्यातील दुसरे सत्कारमुर्ती राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे आपण राजकारणात आलो. त्यांच्यामुळे आमदार झालो. शरद पवार यांच्यामुळे मंत्री झालो. आता लातूरला उजनीचं पाणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे नमुद करून त्यांनी २०२४ साली अमित देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक माचेस्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांनी अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आता लातूर शहराच्या विकासाचा पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढत विकास केला जाईल, अशा शब्दांत मनोगत व्यक्त करून ना. अमित देशमुख, ना. संजय बनसोडे, आ. धिरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत व देखण्या स्वरूपात झाला. कार्यक्रमाला चांगली गर्दी होती. कार्यक्रमास वैशालीताई देशमुख, सौ. आदितीताई देशमुख, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. त्रिंबक भिसे, अशोक राव पाटील निलंगेकर, उल्हास पवार, माजी मंत्री अनिल पटेल, ललितभाई शहा, राजा निटुरे, राष्ट्रवादीचे मकरंद सावे, प्रशांत पाटील, डी. एन. शेळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, प्रा. अनिरूद्ध जाधव आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुपर्ण जगताप व माधव बावगे यांनी मानपत्राचे वाचन केले. बाळकृष्ण धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बरमदे यांनी आभार मानले.


Popular posts